Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर नागपूरे यांचे तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
Pune Unseasonal Rain: नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा दीपक नागपूरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
महापौरांच्या निर्देशानुसार शहरातील झाडांची छाटणी, धोकादायक फांद्या हटविणे, तसेच नाल्यांची व गटारांची साफसफाई ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



