राजूर : अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील भैरवनाथ गडावर दिवाळीच्या पूर्वसंध्याला येणाऱ्या रविवारी मोठी जत्रा भरली. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने गड फुलून गेला होता.
भैरवनाथ गड हे शिरपुंजे गावच्या पायथ्यापासून साधारण यात्रेसाठी 25 ते 30 हजार भाविकांनी हजेरी लावल्याने एकच झुंबड उडाली होती.
जागोजागी वन्यजीव विभागाने रेलिंग लावल्याने भाविकांचा थोडा त्रास कमी झाला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजरी लावली.आदिवासी समाजाचे दैवत असल्यामुळे येथील आदिवासी समाज भात पिकाचे नैवेद्य म्हणून पहिले भैरवनाथाला गडावर जात असतात.
वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 गार्ड व 50 स्थानिक मुलांच्यामार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला. राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने सहायक निरीक्षक प्रवीण दातारे यांनी पोलीस तैनात केले होते.