MSLTA Icon Tennis Tournament : श्रेया पठारेची उपांत्य फेरीत धडक…

Sports in Pune – ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन (१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रेया पठारे, रिशीता पाटील, काव्या देशमुख, श्रेया होनकन यांनी, तर मुलांच्या गटात आराध्य म्हसदे, अर्जुन वेल्लूरी, सक्षम भन्साळी, शार्दुल खवले यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित श्रेया पठारेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या प्रार्थना खेडकरचा ६-३, ६-१ असा पराभव केला. चौथ्या मानांकित रिशीता पाटीलने अनुष्का जोगळेकरचे आव्हान ६-०. ६-०असे एकतर्फी मोडीत काढले. दुसऱ्या मानांकित अद्विता गुप्ताने शर्मिष्ठा कोद्रेचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?
मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित आराध्या म्हसदेने नीव गोजियाचे आव्हान ६-१, ६-२ असे मोडीत काढले. अर्जुन वेल्लुरी याने चौथ्या मानांकित कबीर जेटलीचा ०-६, ७-५ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीने पाचव्या मानांकित रोहन बजाजला ६-३, ६-४ असे पराभूत केले.





