Snooker : पंकज अडवाणीने पटकावले सिंगापूर ओपन बिलियर्ड्सचे विजेतेपद…

Songhe Singapore Open Title 2024 (#Billiards) : क्यू स्पोर्ट्स स्टार पंकज अडवाणीने (Pankaj Advani) सिंगापूरमध्ये स्थानिक स्पर्धक जेडेन ओंगचा (Jaden Ong) 5-1 असा पराभव करून सिंगापूर ओपन बिलियर्ड्सचे ( Songhe Singapore Open title) विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात, पंकजने उपांत्यपूर्व फेरीत माजी आयबीएसएफ (IBSF) जागतिक स्नूकर चॅम्पियन डेचावत पुमचेइंगचा पराभव केला होता.
#Billiards: Indian cueist Pankaj Advani wins Songhe Singapore Open title with a 5-1 victory over Jaden Ong.
(File Photo) pic.twitter.com/S51p7PZRLh
— All India Radio News (@airnewsalerts) October 7, 2024
ओंगने सामन्याची सुरुवात चांगली केली होती पण अडवाणीने सुरुवातीच्या दोन्ही फ्रेम्समध्ये पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत 2-0 अशी आघाडी घेतली. ओंगने तिसरी फ्रेम जिंकली पण अडवाणीने पुढच्या दोन फ्रेम जिंकून सामना जिंकला.
China Open 2024 : गॉफने पटकावले विजेतेपद, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी अमेरिकन खेळाडू….
अंतिम फेरीत अडवाणीने पहिल्या दोन फ्रेम्स जिंकल्या पण त्यानंतर ओंगने पुढील फ्रेम जिंकून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या फ्रेममध्ये अडवाणीने शानदार खेळ केला आणि पाचव्या फ्रेममध्ये 74-6 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. आता पुढच्या महिन्यात पंकज अडवाणी दोहा येथे आपल्या जागतिक बिलियर्ड्स विजेतेपदाचा बचाव करेल.





