चीन, दि. ८ – मालदीवचे नवनियुक्त अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे पाच दिवसांच्या चीन दौर्यासाठी बीजिंगमध्ये दाखल झाले आहेत. या दौर्यादरम्यान ते अनेक करारांवर स्वाक्षर्या करणार आहेत. ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही चर्चा करणार आहेत आणि चीनबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार आहेत.
चीन धार्जिणे नेते अशी ओळख असलेले मुइझ्झू यांच्यासमवेत त्यांची पत्नी सजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरिय अधिकार्यांचे पथक देखील चीनला गेले आहे. चीनमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी फुजियान प्रांतातील फ्री ट्रेड झोनला भेट दिली.
मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताबाबत केलेले वक्तव्य आणि त्यावरून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोइझ्झू यांच्या चीनच्या पहिल्याच भेटीवर मोठी टीका होते आहे.
अध्यक्ष मुइझ्झू यांच्या भेटीदरम्यान, मालदीव आणि चीन अधिकृत चर्चा करतील आणि व्यापार, व्यावसायिक विकास आणि सामाजिक-आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करतील, या भेटीमुळे दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात सहकार्याचा मार्ग मोकळा होईल, असे मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने सांगितले.