नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी विंग कमांडर शंतनू यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल केंद्र सरकारने कॅब ऑपरेटर कंपनी ओलाकडून उत्तर मागितले आहे. शुक्रवारी, सीसीपीडी (अपंग व्यक्तींसाठी आयुक्त) यांनी ओला कॅबला नोटीस बजावून त्यांच्याकडून ३० दिवसांच्या आत स्पष्टीकरण आणि उत्तर मागितले आहे. ओला कॅबच्या ड्रायव्हरने एअरफोर्स ऑफिसर शंतनू यांच्याशी गैरवर्तन करून त्यांच्या पत्नीला दुखावल्याचा आरोप आहे. विंग कमांडर शंतनू दिव्यांग आहेत.
ओला कॅब चालकाने भारतीय वायुसेनेच्या दिग्गज जवानाची व्हीलचेअर नेण्यास नकार दिल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. विंग कमांडर शंतनू यांनी थोड्या अंतरासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यांच्या पत्नीने ड्रायव्हरला व्हीलचेअर फोल्ड करून मागच्या सीटवर ठेवण्याची विनंती केली होती.
मात्र, अद्याप ओळख न पटलेल्या संबंधित चालकाने अपशब्द वापरून आक्रमकपणे उत्तर दिल्याचा आरोप आहे. त्याने व्हीलचेअर ठेवण्यास नकार दिला आणि जोडप्याला कॅब सोडण्यास सांगितले. या घटनेमुळे व्यथित आणि अपमानित झालेल्या वायुसेना अधिकाऱ्याने सीसीपीडीकडे तक्रार नोंदवली आणि चालकावर कारवाई करण्याची मागणी केली.
जानेवारी २०१७ मध्ये विंग कमांडर शंतनूचा जीवन बदलून टाकणारा रस्ता अपघात झाला. दोन महिने कोमात राहिल्यानंतर विंग कमांडर शंतनू यांचे लष्करी रुग्णालय खडकी, पुणे येथे त्यांचे पुनर्वसन केले. पुढच्या वर्षी त्यानी केवळ आपल्या अपंगत्वावर मात केली नाही तर पॅरालिम्पिक स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेतही त्याने दोन सुवर्णपदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.