वाघोली (प्रतिनिधी) : गौण खनिज विषयक शासनाच्या जाचक अटी व याविषयी सतत बदलत्या धोरणामुळे व्यवसायासाठी अडचणी निर्माण होत आहेत तसेच पोलीस विभाग जड वाहतूक बंदीबाबत दुजाभाव करीत असल्याने पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने शुक्रवार (दि.९) पासून बेमुदत बंद पुकारला होता.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष रामदास दाभाडे यांनी वाघोली येथे दिली.
याविषयी खाण व क्रशर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संघटनेचे पदाधिकारी प्रदीप कंद व इतर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात खाण व क्रशर उद्योजक संघाने महसूल मंत्री यांना भेटून व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी बाबत चर्चा केली.
तूर्तास संप मागे घेऊन खाण व क्रशर उद्योजकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन राज्य शासनाच्या मिळाल्याने वतीने संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती दाभाडे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात खान व क्रशर उद्योजकांनी पुकारलेल्या बंद यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.