नवी दिल्ली – मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी आज अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते.
याआधी उमंग बेदी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. ज्यांनी ऑक्टोबर 2017मध्ये पद सोडले. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटा प्लॅटफॉर्मने जाहीर केली आहे.
फेसबुक व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित मोहन हे दुसऱ्या ठिकाणी रुजू होणार आहेत. अजित मोहन फेसबुक इंडियाच्या प्रतिस्पर्धी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये सामील होणार असल्याचे समजते.