टीव्ही अभिनेत्री मीरा जोशी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. लवकरच ती ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘तरला’ मधील अभिनेता शारिब हाशमीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. तसेच पोस्ट शेअर करत तिने शारिब हाशमीबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.
मीरा जोशीने पोस्ट शेअर करत लिहिले की, “दरबानमधील त्यांचे काम पाहिल्यानंतर मी त्यांचं कौतुक करत मेसेज पाठवला होता. त्यांनीही कृतज्ञतेने व नम्रतेने मला रिप्लाय केला होता. त्यावेळेस मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एके दिवशी मी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करेन. तुमच्या अभिनयाबद्दल काय बोलावं! तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे!” अशी पोस्ट मीराने शारिबरोबर एक पोस्ट शेअर करत लिहिली आहे. मीराने शारिब हाशमीसोबतच फोटो देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
मीराच्या या पोस्टवर शारिबने कमेंट करत कौतुकासाठी तिचे आभार मानले. “तुझ्या या शब्दांसाठी धन्यवाद मीरा, तू अप्रतिम आहेस,” असं शारिबने कमेंटमध्ये लिहिले आहे. तिचे चाहत्यांकडून मीराचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, मीरा ‘दार उघड बये’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. याशिवाय ‘कुलस्वामिनी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत आणि. ‘शिवा’, ‘वृत्ती’, ‘लाल बत्ती’, चालू द्या तुमचं’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटातही मीराने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.