पुणे – सासरच्या छळाला कंटाळून महिलेने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २० मेला वाडेबोल्हाईतील शिंदे वस्तीवर घडली. याप्रकरणी महिलेचा पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलम धोंडिबा शिंदे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नवरा धोडिंबा भाउसो शिंदे सासू हिराबाई भाउसो शिंदे आणि सासरा भाउसो बापू शिंदे (सर्व रा. वाडेबोल्हाई, हवेली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर भालेराव यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम आणि धोंडिबा यांचे लग्न झाल्यापासून तिचा सासरचे लोक छळ करीत होते. वेळोवेळी प्रांपचिक कारणाने तसेच संशयीवृत्तीने मारहाण करून नीलमला त्रास देत होते. त्यामुळे छळास कंटाळून नीलमने २० मे ला सकाळी नउच्य सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.