अहमदनगर,नेवासा दि. ८ (राजेंद्र वाघमारे) – चोरुन लाईट व बोगस आकडे टाकून वीज वापरणाऱ्या विरोधात महावितरण कंपणीची धडक कारवाई सुरु असतांना गोणेगांव (ता.नेवासा) येथील एका जोडप्याने चक्क आकडे टाकून लाईट घेवून तपासणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचीच कॉलर धरुन शिवीगाळ केली.” पुन्हा आमचा मुलगा आल्यावर तुमच्याकडे पाहतो” असा दम महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिल्याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अंबादास दत्ताञय रोडे व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
महावितरण कंपणीकडून चोरुन लाईट वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहिम राबविली जात आहे. करजगांव – अंमळनेर येथील महावितरणचे वरिष्ठ तंञज्ञ हरिभाऊ भाऊसाहेब येळे यांच्यासह महावितरण कंपणीचे सात अधिकारी व कर्मचारी गोणेगांव येथील गावांत मीटर चेक करुन ज्या लोकांकडे अधिकृतरित्या मीटर नाही अशा लोकांना अधिकृत मीटर घेवून वीज जोडणीचे आव्हान करत होते. अशात चोरुन आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई करत असताना महावितरण कर्मचाऱ्यांचे हे भरारी पथक गावातील अंबादास दत्ताञय रोडे यांच्या घरी मीटर चेक करण्यासाठी पोहचले. घरात मीटर आढळून आले नाही त्यांच्या घराजवळ असलेल्या इलेक्ट्रिकल पोलवरुन आकडा टाकून चोरुन लाईट वापरत असल्याने आढळले. महावितरणचे कर्मचारी समजावून सांगत असतांना आरोपी रोडे याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच अधिकाऱ्याने मोबाईलवर शुटींग काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने अधिकाऱ्याची कॉलर पकडली. यामध्ये आरोपीची पत्नीही त्याच्या बाजूने अधिकाऱ्यांविरोधात मदत करण्यासाठी होती. नेवासा पोलिस ठाण्यात महावितरणकडून दिलेल्या फिर्यादीवरुन पती – पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोर तर चोर पुन्हा शिरजोर होण्याचा प्रताप
गावात इलेक्ट्रिक पोलवर आकडे टाकून चोरुन लाईट घेणाऱ्या अंबादास दत्ताञय रोडे व त्याच्या पत्नीनेही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.