लखनऊ : सपाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपूर्वी मुलायम सिंह यादव यांना युरिनरी इन्फेक्शन, ब्लडप्रेशरची समस्या आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यचेही सांगितले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलायम सिंह यांना श्राद्धांजली वाहताना एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी,”‘या दु:खाच्या वेळी त्यांनी त्यांचे पुत्र श्री अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला.’असल्याचे म्हटले आहे. तसेच मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री श्री मुलायम सिंह यादव जी का निधन अत्यंत दुखदायी है।
उनके निधन से समाजवाद के एक प्रमुख स्तंभ एवं एक संघर्षशील युग का अंत हुआ है।
ईश्वर से दिवंगत आत्मा की शांति की कामना व शोकाकुल परिवार एवं समर्थकों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 10, 2022
यासोबत त्यांनी लिहिले- ‘उत्तर प्रदेश सरकार मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर करत आहे. त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचवेळी, त्यांच्या आणखी एका ट्विटमध्ये ते लिहितात- ‘उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री मुलायम सिंह यादव जी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने समाजवादाच्या एका प्रमुख स्तंभाचा आणि संघर्षमय युगाचा अंत झाला. दिवंगत आत्म्याला शांती लाभो यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि शोकाकुल परिवार आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.असे त्यांनी म्हटले आहे. याआधी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनीही शोक व्यक्त केला होता.