श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – शहरांमधील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर ,महादेव मंदिर व गणपती मंदिर,महाकालिकामाता मंदिर, मांगिरबाबा व मुंजोबा मंदिर प्रणित पंचकोटी बनमधील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त महाअभिषेक करण्यात आल्याची माहिती पंचकोटी बन कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बाकलीवाल यांनी दिली
सालाबादप्रमाणे याही वर्षी पंचकोटी बन धील महादेव मंदिरामध्ये सकाळी मा. श्री. व सौ.रती यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आला. सांयकाळी महिला दिनानिमित्त १०१ महिलांच्या हस्ते महाआरती करून प्रसाद वाटण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी गणेश सिंग रजपूत, डॉ.बाळासाहेब मोरे, डॉ.रवींद्र पांडे, पत्रकारअनिल पांडे, जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, महावीर काला, जितू कासलीवाल, रामप्रसाद यादव, भारस्कर वकिल,डॉ.खैरनार, विशाल ठाणगे,विजय आखाडे, सुहास पंडित, राजेंद्र महाराज कंत्रोड, बाबा नायर,संकेत संचेती आदी उपस्थित होते.