कोपरगाव – सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधून येथील एका हिंदू युवतीशी मैत्री प्रस्थापित करून प्रेमात पाडले. त्यानंतर इंदोरमधून थेट कोपरगावला येऊन युवतीवर अत्याचार करीत तिचे फोटो व व्हिडीओ काढून तिला लग्नासह धर्मांतर करण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगावमध्ये घडलेल्या या लव्ह जिहाद प्रकरणामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मुख्य आरोपी सायम कुरेशी याला इंदोरमधून तर इम्रान शेख व फय्याज कुरेशी या दोघांना कोपरगावमधून ताब्यात घेतले आहे.
कोपरगाव शहरातील एका युवतीची ओळख इन्स्टाग्रामवरुन मध्यप्रदेशातील इंदोर येथील सायम कुरेशी याच्याशी झाली. ओळखीतून मैञी वाढवली. त्यातुन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा सायम कुरेशी यशस्वी झाला. वर्षांपासून दोघांचे मैत्रीचे संबंध वाढत गेले. याच दरम्यान सायम कुरेशी याने या युवतीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र युवतीने नकार देताच सायम कुरेशी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने तुझ्या कुटुंबातील सदस्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या युवतीने 21 मे 2023 रोजी सकाळी तो कोपरगाव बसस्थानकावर त्याला बोलावून घेतले. युवती भेटायला येताच कुरेशी यांच्यासह येथील स्थानिक इम्रान आयुब शेख, फय्याज कुरेशी (रा. आयशा कॉलनी संजयनगर कोपरगाव) व छोटू उर्फ कलिम पुर्ण नाव समजू शकले नाही. हे साथीदारही आले.
मोटारसायकलवर बसण्यासाठी तिला जबरदस्ती करु लागले. शेवटी दोघांनी मोटारसायकल बसवून शहरातील आण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळील काटवनात घेवू गेले. तिथे झटापटी करुन त्यांनी खडकी जवळील मदरसा येथे युवतीला घेवून गेले. तिथे कुरेशी याच्या या तीन साथीदारांनी युवतीचे हात पाय धरले. त्यानंतर कुरेशी याने अत्याचार केला. त्यावेळी फोटो व व्हिडिओ काढून पीडित युवतीला वारंवार दमबाजी करण्यात आली. त्यानंतर पीडीत युवतीला कुरेशी याने मैत्रिनीच्या लग्नाचे कारण सांगून इंदोरला बोलावून घेत होता. पीडित युवती जाण्यासाठी तयार नव्हती. तेव्हा तुझ्या आई वडीलांना संपवून टाकीन व तुझे फोटो व व्हिडिओ व्हायरल करुन तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली. अखेर पीडित युवती इंदोर येथील जुना पिंठा या ठिकाणी गेली असता कुरेशी याने पुन्हा युवतीवर अत्याचार करुन तेथील एका मौलवीकडून तिला नमाज पठन करून घेतले. तसेच लग्न करुन धर्मांतर करण्याची जबरदस्ती केली.
पीडित युवतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सर्व हकीगत सांगण्यात आली. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या पीडित युवतीची तक्रार रात्री उशीराने दाखल करून आरोपींच्या शोधार्थ दोन पथके रवाना केली. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस कर्मचारी दिलीप तिकोने, गणेश मोड, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, श्रीकांत कुऱ्हाडे, यमाजी सुंबे, राम खारतोडे, महेश फड, गणेश काकडे यांनी मंगळवारी रात्रभरात धरपकड सुरु केली. मुख्य आरोपी सायम कुरेशी याला इंदोर येथून ताब्यात घेतले तर इम्रान शेख व फय्याज कुरेशी दोघांना कोपरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. इंदोरचा मौलवी व अन्य एकाचा शोध पोलीस घेत आहेत.
तर युवकांना भर चौकात फाशी द्या
कोपरगाव येथील युवतीवर झालेला अत्याचार व धर्मांतराच्या प्रयत्नांमुळे हिंदू संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. तर हिंदू मुस्लिम असा भेदभाव न करता या घटनेमधील सत्य बाहेर आले पाहिजे. प्रेमाचा भाग आहे की अन्य काय आहे. जर खरच मुस्लिम युवकांनी जबरदस्तीने काही चुकीचे केले असेल तर त्यांना भर चौकात फाशी द्या, पण दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असा चुकीचा संदेश पसरवू नये, अशी प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी केली आहे.
या घटनेचा सखोल तपास करणार असून यातील दोषींवर कठोर कारवाई करणार आहे. मात्र या घटनेमागे इतर कोणाचे धागेदोरे आहेत का. याला कोणी खतपाणी घालतय की अन्य काय आहे. याची योग्य दिशेने चौकशी करणार आहे.
– रामराव ढिकले,
पोलीस निरीक्षक.