‘किरण राव’ची झाली शस्त्रक्रिया; फोटो शेअर करत डॅाक्टरांचे मानले आभार, नेमकं काय झालं होतं?

Kiran Rao : अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोशल मीडियावर याबद्दलची एक पोस्टही तिने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरणने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स पोस्टद्वारे शेअर केले आहेत.
इंन्स्टाग्रामवरून किरने रावने तीन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या फोटोत सेल्फी पोस्ट केली आहे. दुसऱ्या फोटोत तिच्या हातातील हॅास्पिटल बँड दिसत आहे. अजून एका फोटोत ती बेडवर बसून सूप पिताना दिसत आहे. यासोबत एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये हॅास्पिटल बाहेरचा निसर्ग दिसत आहे.
View this post on Instagram
किरणने कॅप्शमध्ये हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत चिंता व्यक्त केली होती. शस्त्रक्रियेनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
2024 मध्ये रिलीज झालेला किरण रावचा ‘लापता लेडीज‘ चित्रपट खूप गाजला. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचे कौतुक झाले. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले होते. त्यानंतर दोघांनी आपल्या नात्याचा शेवट २००६ मध्ये केला. त्यानंतर आमिरने चित्रपट निर्माती किरण राव हिच्यासोबत लग्न केले. सुखी संसार केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले.




