‘लापता लेडीज’ सिनेमाची ऑस्करसाठी निवड; आमिर खान म्हणाला…

Laapataa Ladies Enter For Oscars| किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडी’ची कथा अनेकांच्या पसंतीस पडली. समीक्षकांनीही या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं. या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. यानंतर सिनेमाची दिग्दर्शिका किरण रावने ऑस्कर टीमचे, तिच्या सर्व टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत किरण रावने आनंद व्यक्त केला आहे. “आमचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेल्याचा मला खूप आनंद आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश मिळालं आहे,” असे किरणने म्हंटले आहे.
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) September 23, 2024
याशिवाय आमिर खान देखील ‘लापता लेडीज’ला ऑस्करसाठी पाठवल्याबद्दल आमिरने ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे आभार मानले आहेत. आमिरने म्हंटले की, “मी ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या ‘लापता लेडीज’ या सिनेमाची निवड करत आमच्या सिनेमाला ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मी आमच्या प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे ‘लापता लेडीज’ला दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार मानतो.”
लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर 2025 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवलं जात आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळालं आहे.
लापता लेडीजची कहाणी
‘लापता लेडीज’ हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. लग्नानंतर बेपत्ता झालेल्या दोन महिलांची ही कथा आहे. , फुल आणि पुष्पा या दोन नववधू रेल्वे प्रवासादरम्यान चुकून त्यांची अदलाबदल होते. एकीला वेगळाच नवरा स्वतःची नववधू म्हणून सोबत घेऊन जातो, तर दुसरी रेल्वे स्टेशनवरच आपल्या नवऱ्याची वाट पाहात थांबते.
पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतात. त्यानंतर खरी नववधू शोधण्यासाठी होणारा ड्रामा यात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांटा,आणि नितांशी गोयल यांसारखे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.




