साठीत पुन्हा प्रेम! कोण आहे आमिर खानची गर्लफ्रेंड? अभिनेत्याने केला खुलासा; जाणून घ्या तिच्याविषयी….

नुकताच बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ६० वर्षांचा झाला आहे. काल त्याच्या वाढदिवसानिमित्त बर्थडे पार्टीत जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी आमिरने आपण एका व्यक्तीला डेट करत असल्याची कबुली दिली. आमिर त्याच्याच एका जुन्या मैत्रीणीला डेट करत आहे. तिचे नाव गौरी स्प्रॅट आहे. मुंबईत आमिरने त्याचा वाढदिवस मीडियासोबत साजारा केला. त्यावेळी त्याने हा मोठा खुलासा केला आहे. यामुळे सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. आमिर गेल्या १८ महिन्यांपासून गौरीला डेट करत आहे.
कोण आहे गौरी स्प्रॅटही ?
गौरी स्प्रॅटही ही मूळची बंगळुरूची रहिवासी आहे. ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते. गौरीला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. बंगळुरूमध्ये सलूनची मालकीण असलेल्या रीता स्प्राट यांची ती मुलगी आहे. गौरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. २००४ मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून तिने एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केला आहे. सध्या ती मुंबईतही बीब्लंट सलून चालवते.
सलमान शाहरुखाला दिली ओळख करून
आमिरने माडियाला दिलेल्या माहितीनुसार, गौरी आणि आमिरच्या नात्याबद्दल त्याच्या घरच्यांनाही माहित असून ते आनंदी असल्याचे त्याने सांगितले. तसेच गौरीची सलमान आणि शाहरुखलाही ओळख करून दिल्याचे तो म्हणाला. तो गौरीला २५ वर्षांपासून ओळखतो.
#AamirKhan celebrates his 60th birthday with the media in Mumbai. #AamirKhan #HappyBirthdayAamirKhan pic.twitter.com/HkX99BY9G4
— Akash Jaiswal (@Akash122) March 13, 2025
आमिरचं लग्न घटस्फोट
आमिरच पहिल लग्न १९८६ मध्ये रीना दत्तासोबत झालं पुढे त्यांचा २००६ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केलं. मात्र, दोघेही २०२१ मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या १८ वर्षांचा नात्याला पूर्णविराम लागला. आमिर खानने गौरीला २०२४ पासून डेट करायला सुरुवात केली असून दोघेही विवाहबंधनात अडकणार का अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.





