Faisal Khan press conference : शॅाकिंग! “आमिरला लग्नाशिवाय मुलं”; भावाचा सनसनाटी आरोप, कोण आहे ती?

Faisal Khan press conference : बॅालिवूड अभिनेता आमिर खानचा सखा भाऊ मेला फेम अभिनेता फैजल खान याने स्वतःच्या भावावरच सनसनाटी आरोप केले आहेत. त्याने केलेल्या आरोपांमुळे सिनेसृष्टीसह सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
१८ अॅागस्ट रोजी मुंबईत अभिनेता फैजल खान याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून अभिनेत्याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आमिरची पहिली पत्नी रिना हिच्यासोबत त्याच लग्न झालं असताना तो किरण रावसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. तसेच त्याचे ब्रिटीश पत्रकार हाइन्ससपासून आमिरला एक मुलगा असल्याचा खळबळजनक दावा त्याने केला आहे, त्याच नाव जान असल्याचं त्याने सांगितलं आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांपासून फैजल खान सिनेमा इंडस्ट्रीपासून दूर होता. त्याने एक पत्र लिहून आमिर आणि कुटुंबीयांसोबत नातं तोडत असल्याचं जाहीर केलं होतं. या पत्रात त्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल सांगितलं होतं की ते कसे आहेत? फैजल याचे कुटुंबीय त्याला लग्न कर असं सातत्याने सांगत होतं, असा दावा त्याने केला आहे. याशिवाय आमिरचं रीनासोबतचं लग्न मोडलं होतं. तो जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता, असं पत्रात त्याने लिहिलं आहे.
फैजल खान काय म्हणाला?
तो (आमिर खान) जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांनी कधी लग्न केलं नव्हतं. आमिर हा किरण रावसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होता. माझ्या वडिलांनी दोनदा लग्न केलं होतं. माझ्या चुलत बहिणीनेही दोन वेळा लग्न केलं होतं. त्यामुळे मी त्यांना बोलत होतो की तुम्ही मला का लग्न करण्याचा सल्ला देताय? असं अभिनेता फैजल खान या पत्रात लिहिल्याचं पत्रकार परिषदेत त्याने सांगितलं.
‘स्टारडस्ट’ मासिकातील दावा
2005 ‘स्टारडस्ट’ मासिकात आमिर आणि जेसिकाच्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल लिहिलं आहे. या दोघांची भेट ‘गुलाम’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. जेसिका ही गरोदर असल्याचं ज्यावेळी आमिरला समजलं, त्यावेळी त्याने तिची साथ सोडली आणि तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा मासिकाच्या लेखात करण्यात आल्याचं अभिनेता म्हणाला.





