आमिरच्या रिलेशनशिपचा खुलासा… किरण रावची दोन वाक्यांची पोस्ट; फोटो अन् कॅप्शनने घेतलं लक्ष वेधून, नेमकं काय म्हणाली?

kiran Rao | नुकताच बॅालीवडूचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरने ६० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मुंबईत मीडिया प्रतिनिधींसोबत आमिराने त्याचा ६० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या वाढदिवसानंतर आमिरने एक मोठा खुलासा केला. ज्यामुळे सगळ्यानांच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. आमिरची गर्लफ्रेड गौरीविषयी त्याने सांगितले. यानंतर सोशल मीडियावर आमिर खान त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आला. अशातच आता त्याची पूर्वपत्नी किरण राने हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आमिरच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोंमध्ये आमिरसोबत त्याचा लेक देखील दिसत आहे. दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. किरणने हा फोटो आमिरच्या वाढदिवशी शेअर केला होता. याच दिवशी आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा देखील केला होता. ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या VVIP व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिठी… हास्यासाठी आणि नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल धन्यवाद… आमचे तुझ्यावर अजूनही प्रचंड प्रेम आहे’ अशी भावना किरण राव हिने तिच्या या पोस्टमधून व्यक्त केली होती.
View this post on Instagram
आमिर खानने त्याची गर्लफ्रेड गौरी स्पॅट्रा हिच्याविषयी सांगितले. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा त्याने केला. गौरी ही मूळची बंगळुरू येथील रहवासी आहे. तिने परदेशातून डिझाईनिंगचा कोर्स केला आहे. ती आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये देखील काम केल्याची माहिती आहे. तसेच तिला एक मुलगा देखील आहे. आता आमिर आणि गौरी लग्नबंधनात अडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.





