ऑस्करसाठी एन्ट्री होताच ‘लापता लेडीज’च्या नावात बदल; नवे पोस्टर समोर

Lapata Ladies Film | किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाची हलकी फुलकी कथा सर्वांच्या पसंतीस पडली. या चित्रपटाने भारताकडून ऑस्करसाठी एन्ट्री घेतली. मात्र आता ‘लापता लेडीज’चे नाव थेट बदलण्यात आले आहे. याचे पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
‘लापता लेडीज’च नाव आता ‘लॉस्ट लेडीज’ असं करण्यात आलं आहे. सिनेमाच्या नावात लापता ऐवजी Lost असं करण्यात आलं आहे. ‘लॉस्ट लेडीज’ नावाने सिनेमा अॅकॅडमी अवॉर्ड्सकडे पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या शर्यतीसाठी नावात थोडा बदल करत नवं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
चित्रपटगृहांमध्ये 1 मार्च 2024 रोजी लापता लेडीज चित्रपट रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही, पण ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर लापता लेडीजने प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकतेच किरण राव आणि आमिर खान यांनी न्यूयॉर्क शहरातही या सिनेमाचं प्रमोशन केले. प्रसिद्ध शेफ विकास खन्नाने या स्पेशल इव्हेंटचं आयोजन केलं होतं. याचे काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. तसंच छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही उत्तम भूमिका साकारली आहे. महिलांवरील संवेदनशील विषयावरील चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी किरण रावचेही कौतुक करण्यात आले.
हेही वाचा:
महायुती सरकारचा उल्लेख करत नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल ; म्हणाले,’मी सांगतो…’





