DC vs GT : ‘…तो पेलूंगा बहुत बता रहा हूँ’, लाईव्ह सामन्यात कुलदीपने पंचांशी घातली हुज्जत, VIDEO व्हायरल

Kuldeep Yadav’s Controversial Video Viral in DC vs GT match : आयपीएल २०२५ मधील ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर २०० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातने साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर सामना एकहाती जिंकला. दरम्यान या सामन्यात कुलदीप यादवने पंचाशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाआहे.
१८ मे रोजी रात्री अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान कुलदीप यादवने पंचांशी वाद घालताना अपशब्द वापरले. ही घटना गुजराच टायटन्सच्या डावातील ८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घडली, जेव्हा कुलदीप यादवने गुगली टाकली ज्यामुळे साई सुदर्शन फसला. कुलदीपने त्याच्या सहकाऱ्यांसह जोरदार अपील केले पण पंच केयूर केळकर यांनी ते फेटाळले. कुलदीपने लगेच कर्णधार अक्षर पटेलला डीआरएस घेण्यास सांगितले.
कुलदीप यादव आणि अंपायरचा व्हिडीओ व्हायरल –
चंद पैसे क्या आ जाये ये सब अपनी औकात दिखा देते है मै इस वीडियो मै जो ये महानुभाव #KuldeepYadav दिख रहे है 👇
देखो और सुनो गौर से वो क्या कह रहे है…
Field मै बदतमीज़ी आजकल आम बात हो गयी है #DCvsGT #Suriya46 #BCCI pic.twitter.com/0oL81g4EAz— महेश सिंह जाट ☮ (@TheRoyal_Jaat) May 19, 2025
मोठ्या स्क्रीनवरील रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू लाईनमध्ये पिंच होत होता आणि सुदर्शनला लागला. बॉल-ट्रॅकिंग सिस्टीमवरून असे दिसून आले की चेंडू लेग स्टंपला स्पर्श करत होता. परंतु, डीआरएस नियमांमधील ‘अंपायर कॉल’ कलमामुळे, निर्णय नॉट आउट राहिला. त्यानुसार, निर्णय रद्द करण्यासाठी, ५० टक्क्यांहून अधिक चेंडू स्टंपवर आदळणे आवश्यक असते.
हेही वाचा – BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय; आशिया कपमधून भारताची माघार!
कुलदीप यादवने पंचाशी घातली हुज्जत –
Bawaal B/W #KuldeepYadav and Field Umpire over Not out decision 😭😭#DCvsGT#IPL2025#IPLpic.twitter.com/WgdhwwhXmU
— Bawaali Shots (@BawaaliShots) May 19, 2025
निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेल्यानंतर कुलदीप यादव पंच केयूर केळकर यांच्याकडे गेला. त्यांना म्हणाला की, ‘क्या लग रहा है भाई आपको? अगर अंपायर कॉल्स आया, तो पेलूंगा बहुत बता रहा हूं.’ यानंतर तिथे उपस्थित असलेल प्लेसिस, अक्षर, आणि पोरेल अंपायरसह हसू लागतात. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही चाहते आता कुलदीप यादवला ट्रोल करत आहेत.
एका विजयाने तीन संघ ठरले प्लेऑफसाठी पात्र –
गुजरात टायटन्सच्या या विजयासह तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले. ज्यामध्ये गुजरात, आरसीबी आणि पंजाबचा समावेश आहे. गुजरातचे १२ सामन्यांत १८ गुण झाले आहेत आणि संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनीही १२ सामन्यांत १७-१७ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दिल्लीचा संघ १२ सामन्यांतून १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग कठीण झाला आहे.





