IPL Mega Trade : आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी ‘ट्रेड डील’! २७ कोटींचा ऋषभ पुन्हा दिल्लीमध्ये; कुलदीप लखनौ संघात सामील
IPL Mega Trade : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स संघात 'घरवापसी' झाली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीचा हुकमी एक्का आणि स्टार चायनामॅन स्पिनर कुलदीप यादव आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

IPL Mega Trade Deal Rishabh Pant DC Kuldeep Yadav LSG IPL 2027 : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी एक हाय-प्रोफाइल ‘ट्रेड डील’ समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स संघात ‘घरवापसी’ झाली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीचा हुकमी एक्का आणि स्टार चायनामॅन स्पिनर कुलदीप यादव आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अनपेक्षित ‘ट्रेड डील’ मानली जात आहे. (IPL Mega Trade)
ऋषभ पंतची दिल्लीत घरवापसी; मानधनात मोठी घट – (IPL Mega Trade)
ऋषभ पंतने २०१६ ते २०२४ या काळात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले असून तो या फ्रँचाइजीचा सर्वात मोठा चेहरा होता. त्याने दिल्लीसाठी सर्वाधिक १११ सामने खेळले असून ४३ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले होते. मात्र, आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने पंतला तब्बल २७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून आपल्या संघात घेतले होते, जी आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली होती.
🚨 Announcement 🚨
Rishabh Pant and Kuldeep Yadav complete high-profile trade between @DelhiCapitals and @LucknowIPL.
Rishabh Pant all set to rejoin #DC at INR 15 Crore whereas Kuldeep Yadav will join #LSG at INR 13.5 Crore.
More Details ▶️ https://t.co/64HeOX143I… pic.twitter.com/tIEvj7fgNo
— IndianPremierLeague (@IPL) June 23, 2026
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ २०२५ मध्ये ७ व्या क्रमांकावर, तर २०२६ च्या हंगामात थेट सर्वात तळाच्या म्हणजेच १० व्या क्रमांकावर फेकला गेला. ऋषभ पंतला ना बॅटने धावा करता आल्या, ना कर्णधार म्हणून चमक दाखवता आली. अखेर या निराशाजनक कामगिरीनंतर त्याची दिल्लीत पुन्हा रवानगी झाली आहे. दिल्लीत त्याचे नवीन मानधन आता १५ कोटी रुपये असणार आहे.
कुलदीप यादव आता लखनौचा नवाब – (IPL Mega Trade )
दुसऱ्या बाजूला, २०२२ पासून दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचा कणा असलेला कुलदीप यादव आता लखनऊ संघात गेला आहे. कुलदीपने दिल्लीसाठी ६५ सामन्यांत ७२ विकेट्स घेतल्या होत्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात विश्वासू फिरकीपटू आता लखनौ सुपर जायंट्सला फिरकीचे जाळे विणून देईल. कुलदीप त्याच्या सध्याच्या १३.५० कोटी रुपयांच्या करारासह (कॉन्ट्रॅक्ट) लखनौ संघात सामील होणार आहे.





