Shubman Gill Fined : शुबमन गिलला दणका! बीसीसीआयची मोठी कारवाई; ‘या’ एका चुकीमुळे गुजरातचा कॅप्टन अडचणीत
Shubman Gill Fined : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलवर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली आहे.

Shubman Gill Fined 12 Lakh IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यात बुधवारी गुजरात टायटन्सने (GT) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १ धावेने थरारक विजय मिळवला. या पहिल्या विजयासह गुजरातने यंदाच्या हंगामातील आपले पहिले दोन गुण कमावले खरे, पण या विजयानंतर कर्णधार शुबमन गिलला मोठा झटका बसला आहे. बीसीसीआयने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण सामना संपल्यानंतर काही वेळातच आयपीएल प्रशासनाने शुबमन गिलवर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याने (Slow Over-Rate) ही कारवाई करण्यात आली आहे.
पुन्हा चूक केल्यास दुप्पट शिक्षा – (Shubman Gill Fined )
Shubman Gill fined for slow over run rate🚨
Shubman Gill has been fined INR 12 lakh for breaching the over-rate regulations during Gujarat Titans’ match against Delhi Capitals.#DCvsGT #ShubmanGill pic.twitter.com/IdbgeduqBd
— Cricket Guru (@CricketGuru_CG) April 9, 2026
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, चालू हंगामातील गुजरातचा हा पहिलाच गुन्हा असल्याने गिलला केवळ १२ लाखांच्या दंडावर सोडण्यात आले आहे. मात्र, हीच चूक पुन्हा झाल्यास हा दंड दुप्पट म्हणजेच २४ लाख होईल. तसेच, तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास गिलवर एका सामन्याची बंदी (Ban) देखील येऊ शकते. यापूर्वी पंजाब किंग्सच्या श्रेयस अय्यरवर सलग दोन सामन्यांत असा दंड आकारण्यात आला आहे.
सामन्याचा थरार अन् केएल राहुलची झुंज ठरली व्यर्थ –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार शुबमन गिलने (७० धावा), जोस बटलरने (५२ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदरने (५५ धावा) शानदार अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने कडवी झुंज दिली. कर्णधार केएल राहुलने ९२ धावांची स्फोटक खेळी केली, तर शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरने (४१ धावा) विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शेवटच्या चेंडूवर एका धावेने दिल्लीचा पराभव झाला. Shubman Gill Fined





