David Miller Emotional : जखमी वाघाची झुंज ठरली अपुरी! विजयाची संधी हुकल्यानंतर मिलर भावूक, VIDEO व्हायरल
David Miller Emotional : विजयाचा घास तोंडातून हिरावला गेल्याने दिल्लीचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर पूर्णपणे कोलमडून गेला.

David Miller Emotional GT vs DC IPL 2026 : अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा धक्का बसला. २११ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होता, पण शेवटच्या चेंडूवर त्यांचे नशीब फिरले. सामना संपल्यानंतर दिल्लीचा स्टार फिनिशर डेव्हिड मिलर अत्यंत भावूक झाला. त्याला रडताना पाहून दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि त्याची पाठ थपथपावून धीर दिला.
मिलरची ‘ती’ एक चूक महागात पडली!
सामन्याच्या शेवटच्या षटकात जबरदस्त थरार पाहायला मिळाला. शेवटच्या दोन चेंडूंवर दिल्लीला केवळ २ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्यात मिलर अपयशी ठरला, पण त्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी सिंगल घेण्यास नकार दिला. शेवटच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने चतुर ‘स्लोअर बाऊन्सर’ टाकला आणि मिलरला हुलकावणी दिली. लेग बायची धाव घेण्याच्या नादात कुलदीप यादव धावबाद झाला आणि दिल्लीचा १ धावेने पराभव झाला. सिंगल न घेण्याचा निर्णय मिलरच्या मनावर बेतला.
जखमी असतानाही मिलरची तुफानी खेळी –
He cried coz he is heartbroken. 💔
He questioned himself that why always me why always im on the other side why god always do this to me.We can understand ur pain you are a champion stay believe in urself @DavidMillerSA12 🫡❤️#DavidMiller pic.twitter.com/TqyaKeMgPx
— Bagad Billa (@maitweethoon) April 9, 2026
बोटाच्या दुखापतीवर उपचार घेऊन मैदानात परतलेल्या डेव्हिड मिलरने दिल्लीला सामन्यात परत आणले होते. शेवटच्या १२ चेंडूत ३६ धावांची गरज असताना, मिलरने मोहम्मद सिराजच्या १९ व्या षटकात दोन षटकार आणि एका चौकारासह तब्बल २३ धावा कुटल्या. त्याने २० चेंडूत नाबाद ४१ धावांची आक्रमक खेळी केली, परंतु शेवटच्या दोन चेंडूंवर प्रसिध कृष्णाच्या चतुर गोलंदाजीपुढे त्याची डाळ शिजली नाही.
केएल राहुलची ९२ धावांची खेळी ठरली व्यर्थ –
तत्पूर्वी, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर (५२), शुबमन गिल (७०) आणि वॉशिंग्टन सुंदर (५५) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१० धावा केल्या होत्या. दिल्लीकडून कर्णधार केएल राहुलने ९२ धावांची झुंजार खेळी केली, पण मोक्याच्या क्षणी राशिद खानने ३ विकेट्स घेतल्याने दिल्लीची धावगती मंदावली. अखेर हा सामना १ धावेच्या फरकाने दिल्लीच्या हातातून निसटला.





