David Miller Decision : मिलरचा ‘तो’ निर्णय म्हणजे वेडेपणा! अश्विनने झापलं, तर गावस्कर मदतीला धावले; दिल्लीच्या पराभवानंतर दिग्गज भिडले
David Miller Decision : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि आर अश्विन यांनी या प्रकरणावर परस्परविरोधी मते व्यक्त केली आहेत.

Sunil Gavaskar Ashwin on David Miller Decision : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीला शेवटच्या दोन चेंडूंवर केवळ २ धावांची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या डेव्हिड मिलरने पाचव्या चेंडूवर धाव घेण्यास नकार दिला. त्याला वाटले की तो शेवटच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारून सामना जिंकवेल, पण प्रसिध कृष्णाने त्याला चकवले आणि दिल्लीचा पराभव झाला. यावर आता सुनील गावसकर आणि आर अश्विनने वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील गावस्कर यांचा पाठिंबा –
सुनील गावस्कर यांनी मिलरच्या आत्मविश्वासाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, “मिलर ज्या पद्धतीने फटकेबाजी करत होता, त्यावरून त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास होता की तो विजयी धाव काढू शकतो. जेव्हा तुम्हाला स्वतःवर इतका विश्वास असतो, तेव्हा तुम्ही असा धोका पत्करता. तो यशस्वी झाला नाही कारण प्रसिध कृष्णाने टाकलेला तो चेंडू अप्रतिम होता. त्यामुळे मिलरला यासाठी दोषी धरणे चुकीचे आहे.”
Heartbreaking scenes 💔 David Miller sitting quietly in the dressing room… sometimes the game hits harder off the field than on it. 🥹#Cricket #DavidMiller #Heartbreak pic.twitter.com/47Mi7sD7mO
— Aijaaz Bhat (@BhatAijaaz) April 9, 2026
आर अश्विनच्या मते मिलरला वेडेपणा नडला –
दुसरीकडे, भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने मात्र मिलरच्या या निर्णयाला ‘वेडेपणा’ म्हटले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, “हे माझ्या समजण्या पलिकडे आहे. जर तुम्हाला ४ किंवा ६ धावा हव्या असत्या तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवणे योग्य होते, पण जेव्हा फक्त २ धावा हव्या होत्या, तेव्हा सिंगल का नाकारली? जर मी कुलदीप यादवच्या जागी असतो, तर मी मिलरला धाव घेण्यासाठी भाग पाडले असते. ही एक मोठी चूक असून यामुळे गुजरातसारख्या संघाला स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.”
अश्विनच्या मते, कुलदीप यादवने स्ट्राईक घेतली असती तर किमान सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत तरी गेला असता. मिलरच्या या एका निर्णयामुळे दिल्लीचे ४ गुण झाले असले तरी त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असल्याची टीकाही अश्विनने केली.





