मुंबई – अभिनेत्री क्रिती सेननने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत क्रितीचे देखील नाव घेतले जाते. क्रितीने अभिनयासह एक निर्माती म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. नुकताच क्रितीची बहीण नुपूरने एक स्पेशल मेसेज दिला आहे. ज्यात क्रितीचे नुपूरने कौतुक केले आहे. मात्र यावरून एका नेटकऱ्याने त्या दोघींना फ्लॉप सिस्टर्स म्हंटले. त्याच्या या कमेंटला नुपुरने प्रत्युत्तर दिले आहे.
क्रितीने तिच्या नव्या कॉस्मॅटिक ब्रॅंडची घोषणा केल्यानंतर नुपूरने 27 जुलै रोजी क्रितीच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या. अनेकांनी क्रिती सेननला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्या दोघी बहिणींना ट्रोल केलं आहे. क्रिती आणि नुपूर या दोघींना ट्रोल केले. एका नेटकऱ्याने त्यांना ‘फ्लॉप सिस्टर्स’ असं म्हंटले. ही कमेंट पाहता नुपूर त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत म्हणाली, ‘तरी तू आम्हाला फॉलो करतो.’ नुपूरच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक करत तिने दिलेल्या सडेतोड उत्तराचे कौतुक केले आहे.
दरम्यान, क्रितीने आता एक निर्माती म्हणूनही करिअरची सुरुवात केली आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक क्रितीने तिच्या प्रोडक्शन हाऊसचा टीझर शेअर केला आहे. ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. क्रितीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती नुकतीच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाई करु शकला नाही. आता लवकरच क्रिती टायगर श्रॉफसोबत ‘गणपत पार्ट 1’ मध्ये दिसणार आहे.