Kareena Kapoor: अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor)अनेकदा पापीराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नुकतेच तिचा मुलगा तेमुरने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला करीना कपूरने हजेरी लावली होती. येथील तिचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आता करीना आणि सैफ कुटुंबासह हरियाणातील त्यांच्या पडौडी पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून येथे ते सुट्टयांचा आनंद लुटत आहेत.
करिनाने तिच्या इनस्टाग्राम आकाऊंटवर पतौडी पॅलेसमधील व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यात काही खाद्यपदार्थांचे फोटो पाहायला मिळत आहे. तर एका चित्रात तिने सेल्फी घेतला आहे. हे फोटो शेअर करत करीना कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्याच बागेतील ‘मक्की की रोटी सरसों दा साग’. हे माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे’. करिनाने विंटर वुमन असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टवर सारा अली खाननेही ‘एक आइडियल लंच’ अशी कमेंट केली. सध्या करीनाच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.
View this post on Instagram
पटौदी पॅलेसचे वैशिष्ट्य
ॲनिमल सिनेमातील शूट झालेला हा बंगला सैफ अली खानचा पटौदी पॅलेस आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पतौडी पॅलेस आहे. सध्या सैफ हा या पतौडी पॅलेसचा मालक आहे या भव्य घराची किंमत ८०० कोटी रुपये आहे. पटौदी पॅलेस १९३५ मध्ये पटौदींचे शेवटचे शासक नवाब इफ्तिखार अली खानने बनवलं होता. या भव्य, अलिशान पटौदी पॅलेसमध्ये १५० खोल्या असल्याची माहिती आहे. प्रत्येक खोलीत फर्निचर आणि कुटुंबातील विविध सदस्यांच्या आठवणी या पॅलेसमध्ये असल्याचं बोललं जातं. याशिवाय पॅलेसमध्ये सात ड्रेसिंग रुन, अनेक डायनिंग रुम, सात लाउंज, बिलियर्ड्स टेबल आणि इतरही अनेक गोष्टी आहेत.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, करीना लवकरच ‘सिंघम 3’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच ती करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये दिसली होती.