मुंबई – कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची टीम अमेरिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाली आहे. कपिलची टीम दरवर्षी असे टूर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. मात्र, यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे कृष्णा अभिषेक कपिलसोबतच्या अमेरिका दौऱ्याचा भाग असणार नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णाने याबद्दल सांगितले. यासोबतच यामागचे कारणही कॉमेडियनने उघड केले आहे.
कपिल आणि त्याच्या टीमने सांगितले की,’त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे आणि ते दौऱ्यावर जाण्यासाठी तयार आहेत. मात्र कृष्णा अभिषेक यात सहभागी होणार नाही. वास्तविक, कॉमेडियनच्या प्रोजेक्ट्सच्या तारखा कपिलच्या यूएस टूरसारख्याच आहेत. अशात तारखांच्या संघर्षामुळे कृष्णाला जाता येत नाही. कृष्णासाठी येथील कार्य अधिक महत्त्वाचे आहे.’ मात्र या पूर्वीही कृष्णा आणि कपिलमध्ये भाडंण झाल्याची चर्चा होती.
पत्रकरांनी कृष्णाला विचारले की, त्याच्यात आणि कपिलमध्ये काही भांडण होत आहे का ? तेव्हा कॉमेडियन म्हणाला,’आमच्यामध्ये काही वाद नाही. माझ्याकडे इतर कमिटमेंट्स आहेत ज्या मला प्रथम पूर्ण करायच्या आहेत. मी जाईन’ कपिल शर्मा आणि त्याची टीम १५ जुलै ला जर्सीमध्ये लाईव्ह परफॉर्म करणार आहे.