शिव ठाकरेसोबत लग्नाच्या अफवांवर डेझी शाहने सोडले मौन

Shiv Thakare And Daisy Shah | ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे आणि अभिनेत्री डेझी शाह यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. डेझी शाहने ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये भाग घेतल्यापासून ती शिव ठाकरेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र दोघांनीही आपण चांगले मित्र असल्याचे वारंवार सांगितले. यानंतर डेझीने देखील यावर प्रतिक्रिया देत शिव ठाकरेसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.
एका मुलाखतीत ती म्हणाली की, “लग्नापर्यंत अफवा पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा बातम्या येत आहेत. शिव आणि माझ्यात काहीही नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. अफवा उडत आहेत कारण एक काळ असा होता जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले होते माझ्यासाठी सर्व काही अगदी नवीन होते आणि कोणीतरी माझा हात धरून मला मार्गदर्शन केले. आमचे नाते वेगळे असण्याचे कारण म्हणजे आम्ही एकमेकांशी खूप बोलतो.”
डेझी शाह पुढे म्हणाली की, “त्याला माझ्यापेक्षा रिॲलिटी शोमध्ये जास्त अनुभव आहे आणि मला चित्रपटांचा जास्त अनुभव आहे. अशा परिस्थितीत आम्ही एकमेकांना सल्ला देतो. आमचे नाते खास आहे कारण आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत अधिक गोष्टी शेअर करता तेव्हा लोक त्याचा अर्थ तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यासारखे गृहीत धरतात.” Shiv Thakare And Daisy Shah |
दरम्यान, शिव ठाकरे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो बिग बॉस १६ मध्ये दिसला आणि सलमान खानच्या या रिॲलिटी शोने त्याला चांगलीच ओळख दिली. यानंतर तो रोहित शेट्टीच्या शो ‘खतरों के खिलाडी सीझन १३’मध्ये झळकला. या शोमध्ये त्याची ओळख अभिनेत्री डेजी शाहसोबत झाली.
शोदरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांचा हा बॉन्ड पाहून अनेकांनी दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. तर डेजी शाह सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटात झळकली होती. यानंतरही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. Shiv Thakare And Daisy Shah |
हेही वाचा:
शेअर बाजाराचा मूड बदलला ; सत्र सुरू होण्यापूर्वी गिफ्ट निफ्टी 650 अंकांनी वधारला





