मुळशी – जळगावमधील पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकत्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन केले जाणार नाही. महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुळशी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर एका आमदार यांच्या कार्यकर्ते यांच्याकडून मारहाण करण्यात येते हे संविधानाला धरून नसून झालेल्या हल्ल्याबाबत सकाळ सहसंपादक निलेश शेंडे यांनी निषेध व्यक्त करताना सांगण्यात आले, पत्रकार हा सर्व सामान्य नागरिकाला अडचणीच्या काळात असो अथवा माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवनातील सर्व घडामोडीवर सविस्तर बातमी द्वारे नागरिकांपर्यंत आपल्या लेखणी द्वारे माहिती पोहचवतो.
त्यांच्यावर होणारे हल्ले याबाबत शासनाने गंभीर दखल घेत कारवाई करावी. होणाऱ्या मराहानी बाबत पत्रकार पप्पू कंधारे यांनी निषेध व्यक्त केला तर पत्रकारांना होणाऱ्या मारहाणी बाबत कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही कायद्याची अंमलबजावणी झाल्यास राजकीय अथवा गुंड प्रवृतीच्या लोकांना वचक बसेल असे सांगितलं.
पत्रकार विनोद माझीरे यांनी आपल्या कडून याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला याबाबत शासनाने गंभीर दखल नाही घेतली तर नागरिकांना एकत्र घेऊन उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा मुळशीतील पत्रकारांच्या वतीने देण्यात आला. मुळशीतील उपस्थित पत्रकारांच्या वतीने तहसिलदार रणजित भोसले आणि पौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातून याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्वरित कडक कारवाई करावी. यावेळी मुळशीतील पत्रकार निलेश शेंडे, विनोद माझीरे, बंडू दातीर, तेजस जोगावडे, गणेश अभिमाणे, विनायक गुजर, विजय वरखडे, पप्पू कंधारे, सचिन केदारी, जितेंद्र गोळे, तजमुल पटेल, गोरख माझीरे, प्रविन सातव, रामदास मानकर, दीपक सोनावणे, राम गायकवाड , प्रदीप पाटील, पांडुरंग साठे आणि इतर मुळशीतील पत्रकार उपस्थित होते.