पारनेर – पारनेर तालुक्यातील मुंगशी येथील युवा पत्रकार प्रवीण करपे यांना स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या गणेश सोनुळे युवकाने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या विरोधात प्रवीण करपे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दि. 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मी दुचाकीवरून पारनेर येथून मुंगशीकडे पारनेर ते सुपा रोडने निघालो होतो. गणपती फाटामार्गे मुंगशीकडे जात असताना रात्री साडेसात वाजताच्या सुमारास गणपती फाटा येथे रोडवर ओळखीचा गणेश सोनुळे हा दुचाकीला आडवा झाला. तू लई मोठा झालाय का? खूप मोठ्या बातम्या देतोय असे म्हणून मला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. मला मारहाण होत असल्याने पारनेरकडे येण्यासाठी निघालो असता त्याने माझी गाडी पकडून रोडवर पाडली. पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.