MPL 2024 : महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार आजपासून, रत्नागिरी जेट्स vs कोल्हापूर टस्कर्स लढतीनं प्रारंभ, जाणून घ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर…

Maharashtra Premier League 2024 : – महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल)२०२४ स्पर्धा आज (रविवार, २जून २०२४ पासून) एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघासमोर उपविजेत्या पुनीत बालन ग्रुप (पीबीजी) कोल्हापूर टस्कर्स संघाचे आव्हान असणार आहे.
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले की, गतवर्षीच्या एमपीएल स्पर्धेत आमच्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. मला विश्वास आहे की महाराष्ट्र प्रिमियर लीगमधील गुणवान खेळाडू भविष्यात आयपीएल व भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेटप्रेमींना मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे मी सर्व क्रिकेट प्रेमींना आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मैदानात येऊन आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवावा.
रत्नागिरी व कोल्हापूर या संघांची एमपीएलमध्ये गतवर्षी अंतिम फेरीसह तीन वेळा गाठ पडली होती. त्यात दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला होता. महाराष्ट्राचा अव्वल फलंदाज अंकित बावणेने वेगवान शतक झळकवताना कोल्हापूर संघाला विजय मिळवून दिला होता. तर क्वालिफायर १ लढतीत कोल्हापूरच्या केदार जाधवने अर्धशतक झळकावूनही रत्नागिरी जेट्स संघाने बाजी मारली होती. अंतिम सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यामुळे सरस धावगतीच्या निकषावर त्यांना विजेते घोषीत करण्यात आले.
T20 World Cup 2024 : ‘हे’ तिन्ही संघ पहिल्यांदाच खेळणार टी-20 विश्वचषक, करू शकतात मोठा उलटफेर….
रत्नागिरी जेट्स संघाकडे नामवंत खेळाडू नसले तरी सांघिक कामगिरी हे त्यांचे बलस्थान आहे. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्याजित बच्छाव याला ६००००रुपये च्या मूळ किंमतीला खरेदी करताना रत्नागिरी संघाने महत्वाचा खेळाडू मिळवला होता. गतवर्षीचा आमचा मूळ संघ कायम ठेवताना आम्ही सत्यजीत बच्छाव समावेश करून फायदा मिळवला आहे, असे सांगून रत्नागिरी संघाचा कर्णधार अझिम काझी म्हणाला की, यंदाच्या मौसमासाठी आमचे पूर्वतयारी शिबिर उत्तमरित्या पार पडले असून सर्व खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. गतविजेतेपद राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
दुसऱ्या बाजूला पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने गतवर्षीचा सर्वात महागडा खेळाडू नौशाद शेखला मुक्त केले. अर्थात, अष्टपैलू श्रीकांत मुंढे, यष्टिरक्षक फलंदाज अनिकेत पोरवाल आणि डावखुरा फिरकीपटू यश खळदकर यांच्या समावेशाने त्यांचा संघ बलवान बनला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोल्हापूर संघात अंकित बावणेसह 19 वर्षाखालील भारतीय संघातील सचिन धस, सिध्दार्थ म्हात्रे आणि तरणजित सिंग धिल्लोन यांसारख्या दर्जेदार खेळाडूंचाही समावेश आहे. गतविजेते आणि उपविजेत्या मधील सलामीच्या लढतीतून अत्यंत रोमांचकारी अशा यंदाच्या एमपीएल मौसमाला तितकाच रोमांचकारी प्रारंभ होईल, अशी क्रिकेट शौकिनांची अपेक्षा आहे.
स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक (तारीख ,सामना, वेळ)
२ जून, रत्नागिरी जेट्स वि. कोल्हापूर टस्कर्स, सायं. ७ वा
३ जून, ईगल नाशिक टायटन्स वि. पुणेरी बाप्पा, दु. २ वा
३ जून, रायगड रॉयल्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज, ७:०० वाजता
४ जून, रत्नागिरी जेट्स वि. रायगड रॉयल्स, दु. २ वा
४ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. पुणेरी बाप्पा, सायं. ७ वा
५ जून, रत्नागिरी जेट्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज, दु. २ वा
५ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. ईगल नाशिक टायटन्स, सायं. ७ वा
६ जून, पुणेरी बाप्पा वि. रायगड रॉयल्स, दु. २ वा
६ जून, ईगल नाशिक टायटन्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज, सायं. ७ वा
७ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. रायगड रॉयल्स, दु. २ वा
७ जून, रत्नागिरी जेट्स वि. पुणेरी बाप्पा, सायं. ७ वा
८ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज, दु. २ वा
८ जून, रत्नागिरी जेट्स वि. ईगल नाशिक टायटन्स, सायं. ७ वा
९ जून, पुणेरी बाप्पा वि. छत्रपती संभाजी किंग्ज, दु. २ वा
९ जून, ईगल नाशिक टायटन्स वि. रायगड रॉयल्स, सायं. ७ वा
१० जून, रत्नागिरी जेट्स वि. कोल्हापूर टस्कर्स, सायं. ७ वा
११ जून, रायगड रॉयल्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
११ जून, ईगल नाशिक टायटन्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा
१२ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. पुणेरी बाप्पा दु. २ वा
१२ जून, रत्नागिरी जेट्स वि. रायगड रॉयल्स सायं. ७ वा
१३ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. ईगल नाशिक टायटन्स दु. २ वा
१३ जून, रत्नागिरी जेट्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज सायं. ७ वा
१४ जून, ईगल नाशिक टायटन्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
१४ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. रायगड रॉयल्स, सायं. ७ वा
१५ जून, पुणेरी बाप्पा वि. रायगड रॉयल्स, सायं. ७ वा
१६ जून, रत्नागिरी जेट्स वि. ईगल नाशिक टायटन्स, दु. २ वा
१६ जून, कोल्हापूर टस्कर्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज, सायं. ७ वा
१७ जून, ईगल नाशिक टायटन्स वि. रायगड रॉयल्स, दु. २ वा
१७ जून, पुणेरी बाप्पा वि. छत्रपती संभाजी किंग्ज, सायं. ७ वा
१८ जून रत्नागिरी जेट्स वि. पुणेरी बाप्पा, सायं. ७ वा
१९ जून, क्वालिफायर १, सायं. ७ वा
२० जून, एलिमिनेटर, सायं. ७ वा
२१ जून, क्वालीफायर २, सायं. ७ वा
२२ जून, फायनल सायं., ७ वा.





