jayant patil : मला मुख्यमंत्रिपद द्या.! अजित पवारांची अमित शाहांकडे मागणी, जयंत पाटील थेट म्हणाले…..

jayant patil | ajit pawar : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच पक्षांना आणि आघाडी असणाऱ्या पक्षांना लागले आहेत. त्यातच यंदाची विधानसभा ही थेट सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दोन्ही आघाडीकडून अजून तरी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा चेहरा कोण असेल हे जाहीर करण्यात आलं नाही. त्यावरूनच सध्या दोन्हीकडे धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकासआघाडीत मुख्यमंत्री कोण होणार यावरुन वाद सुरु झाले आहेत.
मात्र, काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला असल्याचं बोललं जात आहे. एका प्रसिद्धीवृत्तसंस्थेने याबद्दल वृत्त दिले आहे.
दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “निवडणुकीच्या आधी अजित पवार अशी मागणी करतील, असं मला तरी वाटत नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे ते अशी काही मागणी करतील असं मला तरी वाटत नाही.
ही बातमी अशीच कोणीतरी पसरवलेली असेल. कारण भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमधील अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे अजित पवार अशी काही मागणी करतील असं मला वाटत नाही”, असे जयंत पाटील म्हणाले.
ही बातमी नक्की वाचा…





