Sharad Pawar | Chief Ministers | Maharashtra: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी आणि महायुती यांनी सुरूवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील’, असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते.
तर, संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, “लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल’, असं विधान त्यांनी केलं होतं.
दरम्यान, आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरु असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या पक्षांची भूमिका जाहीर केली आहे. ‘आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही’, अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आमच्याकडे मुख्यमंत्रीपदामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आम्हाला परिवर्तन हवं आहे, जनतेला पर्याय हवं आहे त्यासाठी आम्ही काम करत आहोत. लोकांना पर्याय हवाय तो पर्याय उपलब्ध व्हावा’. असं शरद पवार म्हणाले.
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक! शरद पवार म्हणतात….
उद्याच्या महाराष्ट्र बंद विषयी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘हा विषय बदलापूर पुरता मर्यादित नाही. अनेक गोष्टी होत आहेत, मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचार होत आहेत. या घटना वाढत आहेत. लोकांच्या मनात राग आहे उद्रेक आहे,
संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नांची आस्था असलेला प्रत्येक घटक यात सहभागी व्हावा. शांततेच्या मार्गाने बंद पाळला जाणार आहे, पोलिस दलाने अधिक संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर खटले दाखल करण योग्य नाही.
गृहखात्याने संवेदनशील व्हावे या घटना वाढत आहेत, थांबत नाही. कायदा सुव्यवस्था यंत्रणा जागरूक करावी लागेल. कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावं’ असंही शरद पवारांनी म्हटलंय.
ही बातमी नक्की वाचा…..