Political News : मोठी उलथापालथ..! राजकीय पक्ष फुटला; ‘या’ 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात खळबळ
Political News : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक राजकीय घडामोडी समोर आली आहे.

Political News : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार सत्तेत आल्यानंतर आता विरोधी पक्ष एआयडीएमकेला मोठा धक्का बसला आहे. एआयडीएमकेच्या तीन आमदारांनी अचानक आमदारकीचा राजीनामा देत टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Political News)
मधुरंतकमचे मरगथम कुमारेसन, धारापुरमच्या सत्यभामा आणि पेरुंदुरईचे जयकुमार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सादर केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीत टीव्हीके पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे या तिघांमध्ये दोन महिला आमदारांचा समावेश आहे. (Political News)
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने १०७ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली एआयडीएमकेला ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते. आता तीन आमदारांनी पक्ष सोडल्याने एआयडीएमकेची ताकद आणखी कमी झाली आहे. (Political News)
या राजीनाम्यांमुळे संबंधित मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागांवर टीव्हीकेने विजय मिळवला, तर मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठणे अधिक सोपे होणार आहे. (Political News)
दरम्यान, विजय सरकार मंत्रिमंडळ विस्तारात एआयडीएमकेतील काही आमदारांना संधी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावरून डाव्या पक्षांनी नाराजी व्यक्त करत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशाराही दिला होता. (Political News)
दुसरीकडे, एआयडीएमकेने तातडीने कारवाई करत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत तिन्ही आमदारांना निलंबित केले आहे. (Political News)





