Raghuveer khedkar : गावगाड्यातील तमाशा महर्षी, लोकनायक झाला पद्मश्री…; ‘रघुवीर खेडकर’ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान !
रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ, लोकप्रिय तमाशा कलाकार कलाकार आहेत. संगमनेरचे सुपुत्र असलेले खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.

Raghuveer khedkar | Padma shri award : रघुवीर खेडकर यांना कला प्रकारातील तमाशा लोक कलेसाठी (दि. २५) ‘पद्मश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे पुत्र रघुवीर खेडकर असलेले यांनी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘तमाशा’ जागतिक स्तरावर पोहोचवली असून लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यही त्यांनी केले आहे.
रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ, लोकप्रिय तमाशा कलाकार कलाकार आहेत. संगमनेरचे सुपुत्र असलेले खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.
दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावांमध्ये यात्रा भरते. या यात्रेत रघुवीर खेडकर तमाशा सादर करतात. त्यांच्या कलेने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
View this post on Instagram
तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘तमाशा महर्षी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी तमाशाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी आणि प्रबोधनासाठी केला आहे.
कोरोना महामारीत तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती, त्यावेळी त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे’ अध्यक्ष म्हणून पुढाकार घेत कलावंतांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.
रघुवीर खेडकर यांना तमाशाची कला ही वारशात मिळालेली आहे. त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर या एक महान तमाशा कलावंत होत्या. बालपणापासूनच त्यांच्या मनात तमाशाविषयी प्रेम निर्माण झाले. त्यांनी आईचा वारसा पुढे सुरू ठेवत पारंपरिक लोकनाट्य तमाशाची परंपरा जपली आहे.
दोन टप्प्यात पुरस्कारांचे वितरण :
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरण दोन टप्प्यांत होत असून, आजच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 66 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
एकूण पुरस्कारार्थींमध्ये 19 महिला असून, 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.





