IND vs ENG : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! इंग्लंडमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

IND vs ENG Jasprit Bumrah 50 Test Wickets in England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाने १८६ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर जो रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर ७ बाद ५४४ धावांचा डोंगर उभारला आहे. यादरम्यान जसप्रीत बुमराहने जेमी स्मिथला बाद करून मोठी कामगिरी केली आहे. बुमराह इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध ५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने रचला इतिहास –
जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहने जेमी स्मिथला ९ धावांवर बाद करून आपली पहिली विकेट घेतली. या विकेटसह त्याने इंग्लंडमध्ये ५० विकेट पूर्ण केले. विशेष म्हणजे बुमराहचाहा इंग्लंडमधील ११ वा कसोटी सामना आहे. जर बुमराह या सामन्यात आणखी किमान दोन विकेट घेण्यात यशस्वी झाला, तर तो इशांत शर्माच्या ५१ विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकेल आणि इंग्लंडमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज बनेल.
Edged & taken!
Dhruv Jurel with a good low catch. 👌
Jasprit Bumrah strikes to dismiss Jamie Smith. 👍
Updates ▶️ https://t.co/L1EVgGtx3a#TeamIndia | #ENGvIND | @dhruvjurel21 | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/ADTIcHENwO
— BCCI (@BCCI) July 25, 2025
इंग्लंडविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स (इंग्लंडमध्ये) घेणारे गोलंदाज:
- जसप्रीत बुमराह – ११ सामने ५० विकेट्स
- इशांत शर्मा – १४ सामने ४८ विकेट्स
- कपिल देव – १३ सामने ४३ विकेट्स
- अनिल कुंबले – १० सामने ३६ विकेट्स
- बिशन सिंग बेदी – १२ सामने ३२ विकेट्स
हेही वाचा – IND vs ENG : जो रुटची कमाल! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत रचला इतिहास
नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडच्या भूमीवर १५ कसोटी सामन्यांत ५१ फलंदाजांना बाद केले आहे. यामध्ये इंग्लंडविरुद्ध १४ कसोटी सामने आणि न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना यांचा समावेश आहे.
इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज :
- इशांत शर्मा – १५ सामने ५१ विकेट्स
- जसप्रीत बुमराह – १२ सामने ५० विकेट्स
- कपिल देव – १३ सामने ४३ विकेट्स
- मोहम्मद शमी – १४ सामने ४२ विके्ट्स
- मोहम्मद सिराज – ९ सामने ३६ विकेट्स





