Jason Holder Bowling : बॉलिंग की थट्टा? जेसन होल्डरची ‘अजब’ गोलंदाजी! फलंदाज पाहतच राहिला अन् चेंडू….पाहा VIDEO

Jason Holder bowling video viral : क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडेल याचा नेम नाही. सध्या सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल लीग टी२०’ (ILT20) मध्ये वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर याच्या बाबतीत एक अत्यंत विचित्र आणि मजेशीर घटना घडली. होल्डरने टाकलेला एक चेंडू पाहून केवळ खेळाडूच नाही, तर प्रेक्षक आणि खुद्द अंपायरही थक्क झाले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
बॅटिंगमध्ये दाखवली चमक –
१ जानेवारी रोजी आबुधाबी नाईट रायडर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. आबुधाबीकडून खेळताना होल्डरने प्रथम फलंदाजीत कमाल केली. त्याने केवळ ११ चेंडूत २२ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये एक चौका आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याच्या या योगदानामुळे आबुधाबीने १५८ धावांचे आव्हान उभे केले.
नेमकी घटना काय?
“TV Umpire to Director, can we check the height on this one for a No Ball?” 🫣
Keep those towels handy, Knights. 🧻#DCvADKR #DPWorldILT20 #WhereTheWorldPlays #AllInForCricket pic.twitter.com/Mi43Apq7hB
— International League T20 (@ILT20Official) January 1, 2026
जेव्हा आबुधाबीची टीम गोलंदाजीला उतरली, तेव्हा जेसन होल्डरने चेंडू हातात घेतला. गोलंदाजी करत असताना अचानक त्याच्या हातातून चेंडू निसटला. हा चेंडू खेळपट्टीवर टप्पा पडण्याऐवजी हवेतच उडत थेट चौथ्या किंवा पाचव्या स्लिपच्या दिशेने गेला. चेंडू हातातून निसटल्याचे लक्षात येताच होल्डरलाही हसू आवरले नाही. त्यानेही ही चूक हसण्यावारी नेली. मात्र, चेंडू बॅटरपासून खूप लांब आणि अयोग्य रितीने गेल्याने अंपायरने तो तातडीने ‘नो बॉल’ घोषित केला.
हेही वाचा – Usman Khawaja Retirement : उस्मान ख्वाजाची धडाकेबाज निवृत्ती! वर्णभेदावर रोखठोक बोट; SCG वर अखेरचा सामना
सोशल मीडियावर मजेशीर मीम्सचा पाऊस –
सामान्यतः वेगवान गोलंदाजाकडून यॉर्कर किंवा बाउन्सरची अपेक्षा असते, पण होल्डरचा हा चेंडू पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याची फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे. काहींनी याला “वर्षातील सर्वात विचित्र चेंडू” म्हटले आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ‘इंटरनॅशनल लीग टी२०च्या अधिकृत अकाउंटवरूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मैदानात मात्र होल्डरच ठरला ‘बॉस’ –
जरी या एका बॉलमुळे होल्डरची फजिती झाली असली, तरी सामन्यात मात्र त्याने भेदक मारा केला. होल्डरने ३.२ षटकात केवळ १८ धावा देऊन ३ महत्त्वपूर्ण बळी टिपले. त्याच्या या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आबुधाबी नाईट रायडर्सने हा सामना ५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.





