ईशाने देओलने नवीन वर्षांच्या दिल्या शुभेच्छा; सोशल मीडियावर खास पोस्ट करत धर्मेंद्र यांची काढली आठवण

Actress Esha Deol : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. बॅालिवूड इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींनी देखील नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे. खरंतर नवीन वर्षाबद्दल सगेळच खूप उत्साही असतात आणि प्रत्येकाला आपले येणारे वर्ष चांगलेच जावे असेच वाटत असते.
बॅालिवूडमधील कलाकार मंडळी त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसले. कलाकारांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
खरंतर हे वर्ष तिच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी घडणारे ठरले असले तरी याच वर्षात तिचे वडील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. यामुळे जरी या वर्षात अनेक सुखावणाऱ्या गोष्टी घडल्या असल्या तरी ही एक अत्यंत दुःखद घटना २०२५ मध्ये घडली. जेव्हा यांचे धर्मेंद्र त्यानंतर ईशा देओल पोस्ट करत वडीलांच्या आठवणी सोशल मीडियाद्वारे शेअर करत व्यक्त होत आहे.
View this post on Instagram
आताही तिने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक फोटो शेअर करत तुमची आठवण येते पापा. आय लव्ह यू असे म्हटले आहे. फोटोमध्ये ईशा देओल हाताच्या बोटाने आकाशाकडे इशारा करत आहे. यावेळी तिने डोक्यावर कागदाचा मुकुट घातला आहे, ज्यावर “नवीन वर्षाच्या शुभेच्छा” असे लिहिले आहे. तिचे वडील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तिने दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता बॉबी देओलने हृदयाच्या इमोजीसह पोस्टवर कमेंट केली आहे.
हेही वाचा : नवं वर्षानिमित्त प्रभास-तृप्तीच्या चाहत्यांना खास भेट; ‘स्पिरिट’ चित्रपटातील खतरनाक लुक समोर





