Sonali Bendre Birthday : बॉलिवूडमधील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री सोनाली बेंद्रे आज ५१ वर्षांची झाली आहे. १ जानेवारी १९७५ रोजी जन्मलेल्या सोनालीने १९९४ मध्ये ‘आग’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. कमी काळातच तिने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र तिच्या करिअरपेक्षा तिचं वैयक्तिक आयुष्य अधिक चर्चेत राहिलं. सोनालीच्या सौंदर्यावर अनेक मोठी नावं फिदा होती. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होता. काही चित्रपटांनंतर राज ठाकरे सोनालीकडे आकर्षित झाले आणि दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं बोललं जात होतं. त्या काळात राज ठाकरे आधीच विवाहित होते, तरीही ते सोनालीशी लग्न करू इच्छित होते, अशी चर्चा होती. ही बाब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी या नात्याला स्पष्ट नकार दिला आणि हा विषय तेथेच संपला. सोनालीचं नाव पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरसोबतही जोडलं गेलं. शोएब अख्तर सोनालीच्या सौंदर्यावर इतका फिदा होता की त्याने जाहीरपणे तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं. एका मुलाखतीत तर त्याने सोनालीने प्रपोजल नाकारल्यास किडनॅप करण्याची धमकीही दिली होती. यावर सोनालीने ठाम प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, तिला शोएब अख्तर नावाचा कोणताही क्रिकेटर माहित नाही आणि तिला क्रिकेटमध्येही रस नाही. सुनील शेट्टीसोबतही चर्चा १९९५ मध्ये ‘टक्कर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी सोनालीला पसंत करत असल्याची चर्चा होती. मात्र त्या वेळी सुनील आधीच विवाहित असल्याने आणि कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी या नात्यापासून दूर राहणं पसंत केलं. शेवटी सोनालीला तिचं खरं प्रेम दिग्दर्शक गोल्डी बहलच्या रूपात मिळालं. १९९४ मध्ये ‘नाराज’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. मैत्रीपासून सुरू झालेलं नातं प्रेमात बदललं आणि सुमारे पाच वर्षांच्या डेटिंगनंतर १२ नोव्हेंबर २००२ रोजी दोघांनी लग्न केलं. २००५ मध्ये सोनालीने मुलगा रणवीरला जन्म दिला. ९०च्या दशकात सोनाली बेंद्रेने ‘दिलजले’, ‘मेजर साब’, ‘हम साथ-साथ हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. ती शेवटची २०१३ मध्ये ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात झळकली होती. आजही सोनाली तिच्या सौंदर्य, साधेपणा आणि सन्मानासाठी चाहत्यांच्या मनात खास स्थान राखून आहे.