जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. कुलगामच्या हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यात हे ३ जवान जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटर हँडलवर या घटनेबाबत माहिती दिली आहे. कुलगामच्या उंच पर्वतावरील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. तेव्हा घटनास्थळी लष्कर आणि कुलगाम पोलिसांची तुकडी तैनात असल्याचे ट्वीटमध्ये सांगण्यात आले होते. त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये भारतीय लष्कराच्या ३ जवानांच्या जखमी झाल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, कुलगाम एन्काउंटर गोळीबारात भारतीय लष्कराचे ३ जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Operation Halan #Kulgam
On specific inputs regarding presence of terrorists on higher reaches of Halan in Kulgam, operations launched by Security Forces on 04 Aug 23. In exchange of firing with terrorists, three personnel sustained injuries and later succumbed.
Search operations… pic.twitter.com/NJ3DZa2OpK— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) August 4, 2023
तर लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुलगाममधील हलानच्या उंचीवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी ४ ऑगस्ट (शुक्रवारी) शोध मोहीम सुरु केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यामध्ये लष्कराचे तीन जवान जखमी झाले, त्यांना उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे तिन्ही जवानांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता याठिकाणी दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.