“…असा जोडीदार असणे महत्त्वाचे”; प्रिया बापटने पोस्टद्वारे उमेशसाठी व्यक्त केले प्रेम

Priya Bapat And Umesh Kamat | अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांची मराठी सिनेसृष्टीतील जोडी लोकप्रिय आहे. या दोघांची केमेस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसते. सोशल मीडियावर देखील ही जोडी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने पती आणि अभिनेता उमेश कामत सोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
प्रियाने हे फोटो गेल्या दोन वर्षांतील काही क्षण असे सांगत लिहिले की, “मी वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून बराच काळ झाला आहे. अलीकडे जीवनात थोडा बदल जाणवत आहे. सोशल मीडियावर गोष्टी शेअर करण्याची माझी इच्छा पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. पण आज मला ते व्यक्त करावेसे वाटले. कोणतेही विशेष कारण नाही… फक्त माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप कृतज्ञता आणि प्रेम आहे.
View this post on Instagram
त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण मला योग्य वाटतो. शांतता जी दिलासा देते, अर्थपूर्ण गप्पा आणि तो वेडेपणा जो खूप मजेदार असतो. असा जोडीदार असणे महत्त्वाचे आहे, ज्याची जीवनशैली तुमच्याशी जुळते. तुम्ही वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेत असाल, पण तरीही तुम्ही एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्सुक असता,” असे म्हणत तिने उमेशबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. तसेच यातील फोटो तिने दोन वर्षातील काही क्षण असल्याचेही सांगितले आहे. Priya Bapat And Umesh Kamat |
प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघे नुकतेच ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमात पाहायला मिळाले. तर अलिकडेच प्रिया ‘असंभव’ सिनेमात आणि उमेश कामत ‘ताठ कणा’ सिनेमात पाहायला मिळाला. Priya Bapat And Umesh Kamat |
हेही वाचा:





