Priya Bapat : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री प्रिया बापटने सोशल मीडियावर शेअर केलेले जिममधले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. प्रियाचा फिटनेस आणि तिचे ‘ट्रान्सफॉरमेशन’ पाहून चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता. सर्वांनाचा तिच्या डाएटबद्दल जाणून घ्यायचे होते. अखेर प्रियाने इंन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याबाबत सांगितले आहे. शरीर फिट ठेवण्यासाठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी पूर्ण फोकस करत असतात. अभिनेत्री प्रिया बापट देखील तिच्या डाएट प्लॅनवर फोकस करत असते. सोशल मीडियावरून तिने चाहत्यांना फिट राहण्यासाठी खास मोलाचा सल्ला देत तीन महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. नुकतेच प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी फोटोशूट केले होते. यामुळे दोघेही चर्चेत आले आहेत. नुकतेच प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशल घेतले. प्रियाला एका चाहत्याने “तुझा डाएट प्लॉन शेअर कर” अशी विनंती केली. त्यानंतर तिने डाएट प्लॅन शेअर केला. “घरगुती, पारंपरिक आणि पौष्टिक आहारावर लक्ष ठेवा आणि साखर, मैदा व प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून दूर रहा. सर्वात महत्त्वाचे वर्कआउट्स अजिबात टाळता येणार नाहीत” या तीन खास गोष्टी डाएट प्लॅन संदर्भात सांगितल्या आहेत. हेही वाचा : Pune News : प्रभागाचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू; नगरसेविका सारिका घुलेंचे आश्वासन “माझ्या डाएटबद्दल विचारणाऱ्या सगळ्यांसाठी… डाएट हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो. माझ्यासाठी जे उपयोगी ठरतं, ते तुमच्यासाठी तसंच काम करेलच असं नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं”. असे देखील प्रियाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने “मला गोड खूप वाटतं. पण तेही मी प्रमाणातच खाते. फळं भरपूर खाते आणि मला ते खरंच आवडतात, असे तिने सांगितले होते. कलाकार मंडळींचे जीनव कामामुळे खूप धावपळीचे असते. यातूनही प्रिया जेवणाची वेळ नियमित पाळते. विशेष म्हणजे ती रात्री साडेसातच्या आत जेवण करते. हेही वाचा : Mouni Roy Harassment : “कमरेवर हात ठेवला अन् अश्लील हावभाव…” मौनी रॉयसोबत दोन वृद्ध पुरुषांकडून गैरवर्तन