प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण

Priya Bapat and Umesh Kamat | अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांची मराठी सिनेसृष्टीतील जोडी लोकप्रिय आहे. या दोघांची केमेस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसते. या जोडीच्या लग्नाला नुकतीच १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने उमेशने प्रियाला खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमेश कामतने प्रिया बापटला एक सुंदर फुलांचा गुलदस्ता देऊन शुभेच्छा दिल्या. हा खास क्षण प्रियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शनमध्ये प्रियानं लिहलं, “जेव्हा मला वाटतं की तो फारसं व्यक्त होत नाही, तेव्हाच तो असं गोड सरप्राईज देतो. माझा जगातील आवडता माणूस. दसऱ्याच्या दिवशी आजपासून १४ वर्षांपूर्वी आम्ही सात फेरे घेतले”. या व्हिडीओमध्ये उमेश आणि प्रियाचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
प्रिया आणि उमेश यांची ‘आभाळमाया’ या मालिकेच्या सेटवर मैत्री झाली आणि जवळपास ८ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०११ मध्ये दसऱ्याच्या दिवशी लग्न केले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ते मराठी कलाविश्वातील एक आदर्श जोडपे मानले जाते.
प्रिया आणि उमेश यांचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने उमेश आणि प्रिया तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकले. या सिनेमाच्या निमित्तानं प्रिया आणि उमेश यांच्या ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा :





