चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस…’असंभव’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीचा खतरनाक लुक समोर

Asmabhav Movie | सध्या सोशल मिडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आगळ्या वेगळ्या लुकची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहते देखील अचंबित झाले आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया बापट. तिच्या आगामी ‘असंभव’ या चित्रपटासाठी तिने हा खास लुक केला आहे.
‘असंभव’ सिनेमात प्रियाने दुहेरी भूमिका साकारली आहे. साधना सैगल हे पात्र तिने साकारलं आहे. या पात्राची ३५व्या वर्षातील तारुण्यपणातील भूमिका आणि ७५व्या वर्षी म्हातारपणीची भूमिका अशा दुहेरी भूमिकेत प्रिया सिनेमात दिसते. पण, हा लूक करण्यासाठी प्रियाला तब्बल ३.३० तास लागले.
ज्याचा व्हिडिओ देखील तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस असा यात तिचा लुक दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्टमध्ये म्हंटले की, “कलाकार म्हणून सतत नवीन काहीतरी करण्याची, शिकण्याची धडपड असते. आणि अशी संधी फार कमी वेळा मिळते की एखाद्या पात्राच्या वयाचे दोन महत्त्वाचे टप्पे पडद्यावर दाखवता येतात. “असंभव” या आत्ता चित्रपटगृहात चालू असलेल्या आमच्या चित्रपटात “साधना सैगल” म्हणून मला ह्या पात्राचे ३५ आणि ७५ वयही पडद्यावर साकारायला मिळाले. हा मेकअप करायला ३.३० तास लागायचे. या संपूर्ण अनुभवाासाठी सगळ्या टीमचे आभार”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. Asmabhav Movie |
हेही वाचा:





