जेरुसलेम – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचा पुढील आठवड्यात होणारा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांच्या पुढील भारत दौऱ्याचा कार्यक्रम नंतर ठरवला जाणार आहे असे पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागाराने मंगळवारी सांगितले.
बेनेट यांची रविवारी संध्याकाळी कोविड चाचणी घेण्यात आली होती. त्यात त्यांना कोविडची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे.ते 3 ते 5 एप्रिल दरम्यान भारतात येणार होते. तथापि हा दौरा सध्या पुरता रद्द झाला असला तरी भविष्यात हा दौरा होणार असून त्याच्या नवीन तारखा लवकरच ठरवण्यात येतील असे त्या देशाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
बेनेट हे या निमीत्ताने भारताला भेट देणारे पहिले इस्त्रायली पंतप्रधान ठरणार होते, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष राजनैतिक महत्व होते.