मुंबई – देशभरात दिवाळीचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण दिवाळीची विशेष तयारी करतो. सुंदर पोशाख परिधान करण्यापासून ते कुटुंब आणि मित्रांसोबच्या नियोजनापर्यंत प्रत्येकासाठी हा सण खूप खास असतो. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक असलेली ईशा गुप्ता कशी मागे राहील. तिने ही दिवाळीसाठी जोरदार तयारी केली आहे.
ईशा गुप्ता गेल्या आठवड्यापासून दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ईशाने खास साडीमध्ये आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही साडी तिच्या आईची असल्याचे समजते. ईशाने साडीतील आपले फोटो शेअर करत Ma’s saree असं कॅप्शन दिल आहे. पिंक कलर आणि त्यावर गोल्डन बॉर्डर असलेली ही साडी ईशावर खूप सूट होत असलयाचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
View this post on Instagram
साडीसोबतच ईशाने आपल्या आईचे दागिने देखील परिधान केले आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. ईशाच्या नेहमीच्या बोल्ड लुकपेक्षा या ट्रॅडिशनल लूकवर चाहत्यांनी चांगलीच कमेंटबाजी केली आहे.