नवी दिल्ली – इराणने आणखीन ४ अणुभट्ट्या बाधायला सुरुवात केली आहे. इराणच्या दक्षिणेकडील खुझेस्तान प्रांतात या अणुभट्ट्या बांधल्या जाणार असून या अणुभट्ट्यांमधून एकूण ५ हजार मेगावॅट उर्जा निर्मिती अपेक्षित आहे, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सध्या इराणमध्ये एक सक्रीय अणूभट्टी असून या प्रकल्पाद्वारे एक हजार मेगावॅट उर्जानिर्मिती केली जाते. या प्रकल्पाला २०११ मध्ये रशियाकडून ऑनलाईन मदत पुरवली गेली होती. इराकच्या पश्चिम सीमेजवळ, तेल समृद्ध खुजेस्तान प्रांतात ३०० मेगावॅटचा प्रकल्प देखील इराण उभारत आहे.
इराणवर अण्वस्त्रांच्या निरमितीसाठी लागणार् या युरेनियमचा साठा करण्यावर संयुक्त राष्ट्राने निर्बंध घातले आहेत. मात्र तरिही इराणने मोठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा केला आहे. युरेनियमचा साठा करण्याचा इराणचा वेग चिंताजनक असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अणुउर्जाविषयक देखरेख गटाने गेल्या वर्षी म्हटले होते. इराण अण्वस्त्रे तयार करत असल्याचा आरोप पाश्चात्य देशांनी केला होता. मात्रवइराणने हा आरोप फेटाळला होता.
इराणने २०४१ पर्यंत अणूउर्जेच्या माध्यमातून २० हजार मेगावॅट उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ४ अणुभट्ट्या बांधल्या जात असून आणकीन ९ वर्षात हे प्रकल्प कार्यान्वित होतील. राजधानी तेहरानच्या दक्षिणेस सुमारे १,१५० किलोमीटर अंतरावर इराणच्या पूर्व किनारपट्टीवरील सिरिक या बंदर शहरात ही चार नवीन संयंत्रे बांधली जात आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे २० अब्ज डॉलर खर्च येईल आणि ४ हजार जणांना रोजगार मिळेल. प्रत्येक संयंत्राने वर्षाला ३५ टन अणुइंधन वापरणे अपेक्षित आहे, असे इराणच्या अणुउर्जा एजन्सीचे प्रमुख मुहम्मद इस्लाम यांनी म्हटले आहे.