IPL 2024 ( RR vs MI Match 38) : मुंबईनं राजस्थानविरूध्द Toss जिंकला, कर्णधार हार्दिकनं घेतला ‘हा’ निर्णय…

IPL 2024, Rajasthan Royals vs Mumbai Indians Match 38 : आज आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. उभय संघांमधील अखेरच्या सामन्यात राजस्थानने घरच्या मैदानावर मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला होता, तेव्हा गोलंदाजीतील उणीवा दूर करून यजमान मुंबई संघाचे बदला घेण्याकडे लक्ष असेल.
राजस्थानचा संघ यंदाच्या मोसमात 7 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबई संघ 7 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा ( Toss update ) कौल हा मुंबई इंडियन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार हार्दिक पांड्यानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( RR vs MI : Match 38, Mumbai Indians won the toss and elected to bat) त्यामुळे आता राजस्थान संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians elect to bat against Rajasthan Royals.
Follow the Match ▶️ https://t.co/Mb1gd0UfgA#TATAIPL | #RRvMI pic.twitter.com/WdVoFnAvuh
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2024
दरम्यान, याच मोसमात मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत केवळ 4 गडी राखून लक्ष्य सहज गाठले. हा सामना जिंकून मुंबईला राजस्थानकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 29 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी राजस्थानने 13 तर मुंबईने 15 सामने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला. म्हणजे दोन्ही संघांमध्ये विजयाचे अंतर फारसे नाही. त्यामुळे आज त्यांच्यात चुरशीची लढत होईल.





