IPL 2024 (MI vs RCB Match 25) : मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट कोहलीचे ‘असे’ आहेत रेकॉर्ड…

IPL 2024 (MI vs RCB Match 25, Virat Kohli Records: ) : मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळला जाणारा IPL सामना या लीगमधील सर्वाधिक चर्चेचा सामना मानला जातो. हे दोन्ही संघ गुरुवारी (11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने येणार आहेत. या खडतर प्रतिस्पर्ध्यामध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर वरचष्मा राहिला आहे. पण बॅटने विक्रम करण्याच्या बाबतीत विराट कोहली येथे आघाडीवर असल्याचे दिसते.
MI vs RCB : सामन्यात विराटचे रेकॉर्ड
आयपीएलमधील MI vs RCB मेगा मॅचबद्दल बोलायचे झाले तर कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्यानंतर रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्स आहेत. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या 33 डावांमध्ये कोहलीने 31.38 च्या सरासरीने 910 धावा केल्या आहेत, तर 128.53 च्या स्ट्राइक रेटने 5 अर्धशतके झळकावली आहेत.
MI vs RCB सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :
1. विराट कोहली : 33 सामने 910 धावा (5 अर्धशतके)
2. एबी डिव्हिलियर्स : 19 सामने 693 धावा (3 अर्धशतके,1 शतक)
3. रोहित शर्मा : 23 सामने 574 धावा (4 अर्धशतके)
4. किरॉन पोलार्ड : 26 सामने 553 धावा (3 अर्धशतके)
5. अंबाती रायुडू : 16 सामने 431 धावा (2 अर्धशतके)
मुंबई इंडियन्सविरुद्ध RCB च्या दिग्गजाने (विराट कोहली) सर्वोत्तम कामगिरी ही 2018 मध्ये वानखेडे स्टेडियमवर केली होती. त्यावेळी 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने 62 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या होत्या. मात्र, या खेळीनंतरही त्यांच्या संघाला मुंबई इंडियन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
MI vs RCB : सामन्यात वानखेडेवर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू…
1. विराट कोहली : 10 सामने 311 धावा, (2 अर्धशतक)
2. रोहित शर्मा : 9 सामने 331 धावा ( 4 अर्धशतक)
3. एबी डिव्हिलियर्स : 7 सामने 292 धावा (1 अर्धशतक,1 शतक)
MI vs RCB : बुमराहविरुद्ध कोहलीचे रेकॉर्ड…
या सामन्यात विराट कोहलीचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून जसप्रीत बुमराह आहे. गेल्या काही वर्षांत या जोडीमध्ये मोठी लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवे आव्हान दिले आहे. 92 चेंडूंचा सामना करत विराटने वेगवान गोलंदाजाविरुद्ध 140 धावा केल्या आहेत. एमआयच्या स्टार वेगवान गोलंदाजानेही कोहलीला चार वेळा बाद केले आहे.





